मराठी गझल -



 संथशी वाहे हवा ही भोवतीला

आठवांची साथ आहे सोबतीला


जीव माझा लागलेला टांगणीला 

तूच नाही आज माझ्या संगतीला


मीलनाची ओढ आहे आपल्याला

भेट का मंजूर नाही नीयतीला


शोध घ्यावा मी कसा हा माणसांचा

राहिलेना लोक आता पंगतीला


भाववेड्या भावनांनी वेढलेली

आजही त्या आठवांचा रंग तीला


 किरण पिंपळशेंडे.©

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मराठी गझल -

मराठी गझल -