Posts

Showing posts from November, 2023

कविता -

Image
 🪻आईस अर्पण...🪻 रखरखत्या उन्हात... हवेची एक मंद मंद हलकीशी झुळूक यावी आणि मन सुखावून जावं... ती झुळूक म्हणजे आई असते...!! भेगाळल्या भूमीवर... पावसाची पहिली सर पडावी आणि मंद मंद सुगंधाने मन सुखावून जावं... तो सुगंध म्हणजे आई असते...!! व्याकुळल्या वासराची हाक... ऐकून कपिला भरल्या पान्ह्याने धावत सुटावी आणि वासराची भूक शमवावी... ती भूक म्हणजे आई असते...!! नवजात बालकाचे रडणे... आई तो पहिला आवाज, ते रडणे ऐकून त्या पिल्लाला मीठीत घेते... ती मीठी म्हणजे आई असते...!! ती ह्या जगात असताना किंवा नसताना... तिच्याच अवती भवती आपलं सुंदर जग असते... ते जग म्हणजे आई असते...!! सौ. किरण पिंपळशेंडे.©        कोवळी किरणं ह्या कविता संग्रहातून..

मराठी गझल -

Image
 जे मनाच्या आत आहे तेच बोलू भेटल्यावर आठवांचे बंद गाठोडेहि खोलू भेटल्यावर बोलता आले न काही जे कधीही आपल्याला भेद काही एकमेकांचेच खोलू भेटल्यावर मोजमापे लावली होती तुझ्या माझ्यात तेव्हा काल ज्या केल्या चुका त्या आज तोलू भेटल्यावर राखरांगोळीच झाली आपल्याही भावनांची कोरड्या ओल्या जुन्या जखमाच सोलू भेटल्यावर मीच राधा,रुक्मिणीही, मीच आहे बासरीही शाम तू होऊन ये बेधुंद डोलू भेटल्यावर किरण पिंपळशेंडे ©

मराठी गझल -

Image
 किती बोलतो रोजच आपण हवे कशाला काही कारण तुझे बोलणे मी ऐकावे छानच जातो दोघांचा क्षण उगाच वाटे उंच उडावे असे जरी हाताला काकण टाळू नकोस मजला आता सोबत राहू आपण साजण तुझी आठवण सभोवताली रोजच वाटे आहे श्रावण रोज खेळ हे नवे जीवना मागून कसे ना मिळे मरण किरण पिंपळशेंडे.©

मराठी गझल -

Image
 मी तेच ते पुन्हा बोलायला नको आता खुळ्यापरी वागायला नको हातात हात घे सोडू नको असा प्रेमात मग कमी वाटायला नको झाल्या चुका जरी माझ्यातुझ्या किती आपण असे कधी भांडायला नको वेळीच घेतले मन आवरून हे मोहात कोणत्या राहायला नको आले निघून मी शोधीत चांदणे आकाश सावळे भेटायला नको हे दार आठवांचे बंद ठेवले  ठोठावले तरी खोलायला नको किरण पिंपळशेंडे ©

मराठी गझल -

Image
किती वाट आता बघावी दिवसभर  तुला भेटल्यावर किती खास होतो अती होत जातो जिव्हाळाच जेव्हा कधी तोच नात्यातला फास होतो जरी होत गेलो अता वेगळाले तरी एक ताटातला घास होतो कळेना कसे वेगळे सोबती हे सखा कोण होतो कुणी दास होतो कसे गोड मानायचे आठवांना कधी कोणता मास मधुमास होतो किरण पिंपळशेंडे.©

मराठी गझल -

Image
 संथशी वाहे हवा ही भोवतीला आठवांची साथ आहे सोबतीला जीव माझा लागलेला टांगणीला  तूच नाही आज माझ्या संगतीला मीलनाची ओढ आहे आपल्याला भेट का मंजूर नाही नीयतीला शोध घ्यावा मी कसा हा माणसांचा राहिलेना लोक आता पंगतीला भाववेड्या भावनांनी वेढलेली आजही त्या आठवांचा रंग तीला  किरण पिंपळशेंडे.©